परभणीत महापौरांकडून आरोग्य वर्धिनी केंद्राची पाहणी
परभणी, 26 फेब्रुवारी (हिं.स.) – शहरातील साखला प्लॉट येथील महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राला आज महापौर सय्यद इकबाल इय्यद ख्वॉजा यांनी भेट देत कामकाजाची सविस्तर पाहणी केली. पाहणीत केंद्रात दररोज तपासणीसाठी येणार्या रुग्णांची संख्या, लसीकरण म
साखला प्लॉट येथील आरोग्य वर्धिनी केंद्राची महापौरांकडून पाहणी : स्वच्छता, रुग्णसेवा व लसीकरणाबाबत दिल्या सूचना; परिसरात आढळल्या दारूच्या बाटल्या


परभणी, 26 फेब्रुवारी (हिं.स.) – शहरातील साखला प्लॉट येथील महानगरपालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राला आज महापौर सय्यद इकबाल इय्यद ख्वॉजा यांनी भेट देत कामकाजाची सविस्तर पाहणी केली.

पाहणीत केंद्रात दररोज तपासणीसाठी येणार्या रुग्णांची संख्या, लसीकरण मोहीम, गरोदर मातांना उपलब्ध सुविधा, विविध नोंदणी रजिस्टरची स्थिती तसेच केंद्राच्या आतील व बाहेरील परिसरातील स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. महापौरांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे तसेच नागरिकांनी खासगी रुग्णालयांऐवजी शासकीय आरोग्य केंद्रावर विश्वास ठेवावा, यासाठी दर्जेदार आरोग्य सुविधा आणि सन्मानपूर्वक वागणूक देण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान, आरोग्य केंद्राच्या परिसराची पाहणी करत असताना महापौरांना तेथे दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. संबंधित पोलीस निरीक्षकांना घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची तसेच रुग्णालय परिसरात गैरवर्तन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले.

----------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande