मुख्यमंत्र्यांना अवैध बांगलादेशी प्रकरणी स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी
अकोला, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। जावेद जकारिया (प्रदेश संघटक सचिव, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून राज्यातील कथित अवैध बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावर शासनाने
मुख्यमंत्र्यांना अवैध बांगलादेशी प्रकरणी स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी


अकोला, 28 फेब्रुवारी (हिं.स.)। जावेद जकारिया (प्रदेश संघटक सचिव, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून राज्यातील कथित अवैध बांगलादेशी नागरिकांच्या मुद्द्यावर शासनाने स्पष्ट व ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.

निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, राज्याचे मंत्री नितेश राणे तसेच माजी खासदार किरिट सोमैया यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्यास असल्याचे वक्तव्य केले आहे. या विधानांमुळे राज्यात संभ्रम व सामाजिक तणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.जकारिया यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, जर खरोखरच राज्यात अवैध परदेशी नागरिक आढळत असतील तर शासनाने विशेष मोहीम राबवून त्यांची ओळख पटवावी आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांना देशाबाहेर पाठवावे. तसेच या कारवाईबाबत शासनाने अधिकृत व सार्वजनिक निवेदन करून जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी.

परंतु जर चौकशीत असे आरोप निराधार ठरले, तर समाजात भडकावू वातावरण निर्माण केल्याबद्दल संबंधितांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.“महाराष्ट्राची ओळख ही सामाजिक सलोखा, बंधुता आणि संविधानिक मूल्ये यासाठी आहे. त्यामुळे या संवेदनशील विषयावर शासनाने पारदर्शक व निष्पक्ष भूमिका जाहीर करावी,” असे जकारिया यांनी निवेदनात नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande