अजित पवारांचा अस्थिकलश अकोल्यामध्ये दाखल
अकोला, 03 फेब्रुवारी (हिं.स.)।दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश अकोल्यामध्ये दाखल झाला आहे. आज दिवसभर हा अस्थिकलश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला. संध्याकाळी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी हा
Photo


अकोला, 03 फेब्रुवारी (हिं.स.)।दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश अकोल्यामध्ये दाखल झाला आहे. आज दिवसभर हा अस्थिकलश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्यालयात दर्शनासाठी ठेवण्यात आला. संध्याकाळी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरी हा कलश नेण्यात आला.

अस्थिकलश दाखल झाल्यानंतर या अस्थिकलशाचे दर्शन महानगर अध्यक्ष विजय देशमुख आणि कार्यकर्त्यांनी घेतले. दिवसभर सर्व पक्षांसाठी हा अस्थिकलश दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आला होता. या अस्थिकलशाचे दर्शन घेताना स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काहीशे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. अजितदादांसारखा कणखर नेता आपल्यातून निघून गेला असे अजूनही वाटत नाही अशा भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande