जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची हिप्पळगाव येथे प्रचार सभा
लातूर, 03 फेब्रुवारी (हिं.स.)।जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगाव येथे भव्य प्रचार सभा पार पडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आप
चंद्रशेखर बावनकुळे


लातूर, 03 फेब्रुवारी (हिं.स.)।जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचे महसूल मंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांची शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हिप्पळगाव येथे भव्य प्रचार सभा पार पडली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणातून येरोळे जिल्हा परिषद उमेदवार सौ. तुळसाबाई लोंढे, साकोळ जिल्हा परिषद उमेदवार विठ्ठल वाघमारे, हिप्पळगाव पंचायत समिती उमेदवार संजय सूर्यवंशी, येरोळ पंचायत समिती उमेदवार पुष्पमाला मठपती तसेच साकोळ पंचायत समिती उमेदवार मीना लांडगे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन उपस्थित जनतेला केले.या सभेला माजी मंत्री व आमदार संभाजी पाटील निलंगेकर, भाजप जिल्हाध्यक्ष बस्वराज पाटील,अरविंद पाटील निलंगेकर, शैलेश गोजमगुंडे, माधव बिराजदार, गोविंद चिलमुरे, श्री. मंगेश पाटील, संजय दोरवे, ज्ञानेश्वर चेवले, सौ. वर्षाताई भिक्का, गणेश धुमाळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

--------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande