अकोला पोलिसांनी जप्त केला 18 किलो गांजा, आरोपी गजाआड
अकोला, 03 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई केली आहे.. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी अकोल्यातील पातूर रोड वर मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे.. काही जण गांजाची विक्री करीत असल्याच्या
Photo


अकोला, 03 फेब्रुवारी (हिं.स.)। अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई केली आहे.. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी अकोल्यातील पातूर रोड वर मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे.. काही जण गांजाची विक्री करीत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून तब्बल 18 किलोवर गांजा जप्त केला आहे.. याप्रकरणी अनिस खान इमाम खान याला अटक करून त्याच्याकडून गांजा सह साडे पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत..

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथील पथकाला गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि, पो.स्टे. जुने शहर, अकोला हद्दीतील अकोला पातुर रोडवरील चांदुर फाटया लगत अमनदिप हॉटेल च्या बाजुला येथे काही इसम अंमली पदार्थ गांजा विक्री करीता स्वतः जवळ बाळगुन घेवुन जात असल्याबाबत माहिती मिळाल्याने शासकिय पंचासमक्ष रेड करून आरोपी नामे अनीस खान इमाम खान, वय ३८ वर्ष, रा. छबनमा नगर, अवेज करनी मज्जीद्र जवळ, खैर मोहम्मद प्लॉट अकोला यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एकुण १८ किलो ३८० ग्रॅम गांजा कि.अं. ४,५७,५००/ रू चा व दोन मो.सा कि.अं. १,१०,०००/ रु असा एकुण ५,६७,५००/ मुद्देमाल जप्त करण्यात आला वरून आरोपीविरूध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट अन्वये कारवाई करून आरोपीस पुढील कारवाई कामी पो.स्टे. जुने शहर अकोला यांचे ताब्यात देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande