
अकोला, 03 फेब्रुवारी (हिं.स.)। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे मार्गदर्शना खाली ऑपेरेशन प्रहार जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा, अकोला च्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीवरून मोठी कारवाई करण्यात आली.
आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक API विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विष्णु बोडखे, पो.उपनि. माजिद खान पठाण तसेच पोलीस अमलदार हे खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना पोळा चौक, अकोला येथे दुपारी १४.३० वाजता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार दहीहांडा वेस, खिडकी पुरा, अकोला येथील शेख सद्दाम शेख मेहबुब व मोबिन कुरेशी मोहसीन कुरेशी यांनी खिडकी पुरा मश्जीद समोर त्यांच्या ताब्यातील मोकळ्या जागेत गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवली असल्याची माहिती प्राप्त झाली
सदरची माहिती पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, शंकर शेळके यांना देण्यात आली, वरून वरून आयपीएस ईशानी आनंद, निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, शंकर शेळके यांच्या उपस्थिती मध्ये, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून दुपारी नमूद ठिकाणी छापा टाकण्यात आला. छाप्यात एकूण २५ गोवंश जातीची जनावरे अत्यंत दयनीय, जखमी व अशक्त अवस्थेत आढळून आली. जनावरांना पाणी व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था नसून ती कत्तलीसाठीच बाळगण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सदर जनावरांची अंदाजे किंमत ₹६,१५,०००/-इतकी आहे. आरोपींचा शोध घेण्यात आला असता ते त्यांच्या राहत्या घरी तसेच परिसरात मिळून आले नाहीत. तसेच जनावरांबाबत कोणतीही वैध कागदपत्रे उपलब्ध झाली नाहीत. सदर २५ गोवंश जातीची जनावरे पंचनामा करून जप्त करण्यात आली असून त्यांची देखभाल, सुरक्षा व उपचारासाठी आदर्श गोसेवा केंद्र, ग्राम म्हैसपूर, अकोला येथे अटी-शर्तीवर सुपूर्द करण्यात आली आहेत. या प्रकरणी फरार आरोपी शेख सद्दाम शेख मेहबुब व मोबिन कुरेशी मोहसीन कुरेशी, दोन्ही रा. दहीहांडा वेस, खिडकी पुरा, अकोला यांच्याविरुद्धमहाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ कलम ५, ५ (क), ९, ९ (अ), प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कायदा १९६० कलम ११ (ड), भारतीय न्याय संहिता कलम ३२९अन्वये कायदेशीर फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे