
अकोला, 03 फेब्रुवारी (हिं.स.) :
जया एकादशीच्या शुभ मुहूर्तावर दिव्या अॅग्रो फार्म, कातखेड येथे विठ्ठल परिवाराच्या वतीने विठ्ठल नामजप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हभप संतोषदादा पिसे महाराज यांनी नामजपाचे शास्त्रीय फायदे, मानसिक शांती व व्यसनमुक्तीचे महत्त्व विशद केले.
या मार्गदर्शनाने प्रेरित होऊन अशोक ठाकरे यांनी दारूचे व्यसन सोडण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजक रुपेशदादा लडे यांनी विठ्ठल नामाचे वेड माणसाला महान बनवते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला शहरातील अनेक साधक व मान्यवर उपस्थित होते.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे