अकोला मनपा: थकित मालमत्ता करांवर कारवाई, आठले प्लॉट मराठा नगरवरील मालमत्ता सील
अकोला, 03 फेब्रुवारी (हिं.स.) । अकोला महानगरपालिकेच्या प्रशासनाने शहरातील थकित मालमत्ता करावर कठोर पावले उचलली आहेत. मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार आणि सहा. आयुक्त रा
अकोला मनपा: थकित मालमत्ता करांवर कारवाई, आठले प्लॉट मराठा नगरवरील मालमत्ता सील


अकोला, 03 फेब्रुवारी (हिं.स.) । अकोला महानगरपालिकेच्या प्रशासनाने शहरातील थकित मालमत्ता करावर कठोर पावले उचलली आहेत. मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशान्वये तसेच अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, उपायुक्त विजय पारतवार आणि सहा. आयुक्त राजेश सरप यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व झोन, आठले प्लॉट मराठा नगर, वार्ड क्र. A-2, मालमत्ता क्र. 2535 या ठिकाणची मालमत्ता सील करण्यात आली आहे.

सदर मालमत्ता धारक श्रीधर मोतीराम खुमकर यांच्याकडे 2017-18 पासून एकूण रु. 1,08,906/- इतका मालमत्ता कर थकित असल्याने ही कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान जप्ती पथक प्रमुख सुधीर मिसुरकर, कर वसुली लिपिक राजेश साळुंखे, संतोष पांडे, दीपराज महल्ले, संतोष वेले, गणेश पद्मने, तसेच सुरक्षा रक्षक संगीता शिंदे यांची उपस्थिती होती.

मनपा प्रशासनाने शहरातील सर्व मालमत्ता धारकांना आवाहन केले आहे की, आपल्या थकित तसेच चालू वर्षातील मालमत्ता कराचे भरणे वेळेत करून सील, जप्ती व लिलाव यांसारख्या कठोर कारवाईपासून स्वतःचे संरक्षण करावे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande