लातूर जिल्ह्यात भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप
काँग्रेसने प्रचार सभेत मतदारांना जागरूक केले लातूर, 03 फेब्रुवारी (हिं.स.) । लातूर जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात असताना जिल्ह्यात कोणतेही ठोस विकासकाम झाले नसल्याचा आरोप काँग्रेस नेते व लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख या
धिरज देशमुख


काँग्रेसने प्रचार सभेत मतदारांना जागरूक केले

लातूर, 03 फेब्रुवारी (हिं.स.) । लातूर जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात असताना जिल्ह्यात कोणतेही ठोस विकासकाम झाले नसल्याचा आरोप काँग्रेस नेते व लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केला आहे.

निलंगा तालुक्यातील लांबोटा आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित काँग्रेस उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतदारांना आपल्या मताची ताकद ओळखून वापरण्याचे आवाहन केले.

धिरज देशमुख म्हणाले की, भाजपकडून रेल्वे बोगी कारखान्याच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार युवकांना नोकऱ्या दिल्या जाणार असल्याचे आश्वासन दिले गेले होते; मात्र प्रत्यक्षात एकही युवकास नोकरी मिळाली नाही, त्यामुळे युवकांची फसवणूक करण्यात आली आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजपच्या निष्क्रियतेच्या उलट, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि मांजरा परिवारातील साखर कारखाने ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देत असून शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणले आहे.

धिरज देशमुख यांनी पुढे सांगितले की, भाजपच्या भ्रष्टाचाराचा कासरा आवळण्यासाठी ही योग्य वेळ असून येत्या ७ तारखेला काँग्रेसच्या ‘हात’ चिन्हाला साथ देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी काँग्रेसचे नेते अशोकराव पाटील निलंगेकर, जिल्हा अध्यक्ष अभय साळुंखे, तसेच उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते.

----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande