चंद्रपूर महापौर व उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा १० फेब्रुवारी रोजी
चंद्रपूर, ४ फेब्रुवारी (हिं.स.) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी नागपूर विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभ
चंद्रपूर महापौर व उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा १० फेब्रुवारी रोजी


चंद्रपूर, ४ फेब्रुवारी (हिं.स.) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी नागपूर विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या निर्वाचित सदस्यांची पहिली विशेष सभा दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मनपा राणी हिराई सभागृहात आयोजित केली जाणार आहे.

महापौर व उपमहापौर पदासाठी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत विविध पक्षांकडून एकूण ३६ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये:

भारतीय जनता पक्ष: १८ अर्ज,

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: १० अर्ज,

भारतीय शेतकरी कामगार पक्ष: ४ अर्ज,

अपक्ष उमेदवार: ४ अर्ज

यांचा समावेश असून

नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अर्ज महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील नगरसचिव यांच्या कक्षात स्वीकारले जातील.

अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे:

आधार कार्ड,

निवडणूक प्रमाणपत्राची सत्यप्रत किंवा जमा केल्याची पोचपावती,

जात प्रमाणपत्र

जात वैधता प्रमाणपत्र किंवा पडताळणी समितीकडे सादर केल्याची पोचपावती, तसेच 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र

--------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande