
रत्नागिरी, 4 फेब्रुवारी, (हिं. स.) : उत्कर्ष सेवाभावी संस्थेने इन्फिगो आय केअर यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मा वाटप शिबिरात १०० विद्यार्थांची तपासणी करण्यात आली.
या उपक्रमाचा प्रारंभ रत्नागिरीतील झाडगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये झाला. यावेळी रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेविका सुप्रिया रसाळ, नगरसेवक संदीप सुर्वे, शहराध्यक्ष दादा ढेकणे, विश्वस्त गणेश सलीम, सामाजिक कार्यकर्ते संदीप रसाळ, इन्फिगो आय केअरचे ब्रांच मॅनेजर सुशांत पांचाळ, मार्केटिंग हेड मंगेश पावस्कर व शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
या उपक्रमात रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी हायस्कूलमधील शंभर विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर यांनी आभार मानले. जिल्ह्यात ठिकठिकाणी अशा मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. भाटलेकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी