छत्रपती संभाजीनगर-महसूलमंत्री बावनकुळेंचे भाजपच्या नगरसेवकांसोबत प्रिती भोजन
छत्रपती संभाजीनगर, 05 फेब्रुवारी (हिं.स.)नवनिर्वाचित नगरसेवकांच्या स्नेहभोजन कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अतुल सावे (कॅबिनेट मंत्री)खा.डॉ.भागवत कराड(माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री)आ.ना
A celebratory dinner for BJP corporators was held in the presence of Revenue Minister Bawankule.


छत्रपती संभाजीनगर, 05 फेब्रुवारी (हिं.स.)नवनिर्वाचित नगरसेवकांच्या स्नेहभोजन कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला अतुल सावे (कॅबिनेट मंत्री)खा.डॉ.भागवत कराड(माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री)आ.नारायणभाऊ कुचे,

शिरीष बोराळकर(माजी शहराध्यक्ष)राजाभाऊ शिंदे(माजी उपमहापौर)विवेक देशपांडे, बसवराज मंगरुळे (प्रदेश उपाध्यक्ष) यांची उपस्थिती होती.

या स्नेहभाजन कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना मंत्रिमहोदयांनी, छत्रपती संभाजीनगरमधील सुज्ञ मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून जो प्रचंड प्रतिसाद दिला, त्याला सार्थ ठरवत छत्रपती संभाजीनगरच्या विकासासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत राहण्यास सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथील भाजपच्या नवनिर्वाचित ५७ नगरसेवकांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत ‘डिनर डिप्लोमसी’ पार पडली. नगरसेवकांचे एकत्रीकरण मजबूत करण्यासाठी शहराध्यक्षांच्या निवासस्थानी प्रीतिभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. महापौर व उपमहापौर निवडणूक पूर्ण होईपर्यंत कुणीही शहर सोडू नये, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. बहुमतासाठी केवळ एक जागा कमी असली तरी नगरसेवकांमध्ये फूट पडण्याची शक्यता नसल्याने पक्षाने सहलीचा पर्याय टाळला. आगामी काळात महापौर, उपमहापौर, गटनेता व विविध समित्यांमध्ये अधिकाधिक नगरसेवकांना संधी देण्यावर विचार सुरू आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande