अकोला - संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात 117 उपाययोजनांचा समावेश
अकोला, 05 फेब्रुवारी (हिं.स.) यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी 117 उपाययोजनांचा समावेश असलेल्या 3 कोटी 87 लक्ष रू. च्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मान्यता दिली. हा प्रस्ताव जि. प. मुख्य कार्यकारी अध
अकोला - संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात 117 उपाययोजनांचा समावेश


अकोला, 05 फेब्रुवारी (हिं.स.) यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई उद्भवू नये यासाठी 117 उपाययोजनांचा समावेश असलेल्या 3 कोटी 87 लक्ष रू. च्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मान्यता दिली. हा प्रस्ताव जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन आराखड्यात 188 गावांचा समावेश आहे.

अकोला तालुक्यातील 16, बार्शिटाकळीतील 49, बाळापूरमधील 11, पातूरमधील 50, मूर्तिजापूरमधील 24, अकोटमधील 18 व तेल्हारा तालुक्यातील 20 गावांचा समावेश आहे. उपाययोजनांत विहिर अधिग्रहणाची 129, विहीर खोलीकरणाची 9, नळयोजना विशेष दुरूस्तीची 11, विंधनविहीरींची 45 व कूपनलिकांची 23 कामे प्रस्तावित आहेत. त्यानुसार कामांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande