अकोला - अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
अकोला, 05 फेब्रुवारी (हिं.स.)आदिवासी विकास विभागातर्फे परदेशातील शैक्षणिक संस्थांत 2026-27 या वर्षात पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएडी अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त
अकोला - अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती


अकोला, 05 फेब्रुवारी (हिं.स.)आदिवासी विकास विभागातर्फे परदेशातील शैक्षणिक संस्थांत 2026-27 या वर्षात पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएडी अशा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्था जागतिक क्रमवारीत 200 च्या आत असावी. उमेदवार व उमेदवाराचे आई,वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावे. उमेदवाराच्या पालकांचे,कुटुंबाचे व उमेदवार नोकरी करत असल्यास त्याचे स्वतःचे उत्पन्न धरून सर्व मार्गांनी मिळणारे मागील आर्थिक वर्षातील एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त नसावे.

विहीत निकषांनुसार पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास उत्पन्न मर्यादा १० लाखापर्यंत, तसेच विद्यापीठाची जागतिक क्रमवारी 300 पर्यंत शिथील केली जाईल. अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुज्ञेय लाभ, निवड कार्यपद्धती आदी माहिती आदिवासी विभागाच्या https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे आदिवासी विकास आयुक्त लीला बनसोड यांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande