
बीड, 05 फेब्रुवारी (हिं.स.)
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्यालयात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या वेळी शोकाकुल वातावरणात अस्थिकलशाचे दर्शन घेताना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बीडकरांचे डोळे पाणावले. आ. विजयसिंह पंडित यांनी श्रीक्षेत्र राक्षसभुवन (शनीचे) येथे अस्थिविसर्जन केले.
नेतृत्वाखाली बीड शहरातील जनतेने नगरपालिका निवडणुकीत भरभरून आशीर्वाद दिले. बारामतीसारखा बीड शहराचा विकास करण्याचा संकल्प दादांनी केला होता. स्व. अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा संकल्प आम्ही केलाअसेही ते म्हणाले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित, आ. धनंजय मुंडे, आ. प्रकाश सोळंके, माजी आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, संजय दौंड यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis