
पुणे, 05 फेब्रुवारी (हिं.स.)। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडून वेगाने सुरू झाला आहे. 28 जानेवारीला मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ लिअरजेट 45 विमान कोसळले होते. या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत विविध शंका उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या अपघाताची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष या अपघाताच्या चौकशी करायला लागले आहे. अशातच AAIB ने अपघाताचे तपास तीन स्तरांमध्ये (थ्री लेअर) विभागले असून, प्रत्येक स्तरावर सखोल काम सुरू आहे. घटनास्थळावरील तपास पूर्ण झाला असून, विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्स-दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. येथे डेटा रिकव्हर आणि विश्लेषण सुरू झाले आहे. या स्तरात विमानाचा वेग, उंची, इंजिन तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, वैमानिकांमधील संभाषणे आणि इतर महत्त्वाच्या तांत्रिक माहिती संकलित केली जाईल.त्यानंतर दुसऱ्या स्थरात अवशेषांचे प्रयोगशाळा विश्लेषण केले जाईल.
विमानाचे अवशेष गोळा करून मुंबई किंवा दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवले जातील. येथे भागांचे मायक्रोस्कोपिक परीक्षण, मटेरियल फेल्युअर, इंजिन किंवा नियंत्रण प्रणालीतील बिघाड यांचे सखोल विश्लेषण होईल. तिसरा स्थरात अहवाल सादरीकरण होणार आहे. प्राथमिक अहवाल सादर केला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु