

बीड, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।
बीड येथील महिला डॉक्टरांसाठी आयोजित 'वुमन्स डॉक्टर प्रीमियर लीग'च्या पहिल्याच सीझनमध्ये बजाज ब्लास्टर्स संघाने बाजी मारली. अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये डॉ. प्रियंका बजाज यांच्या नेतृत्वाखालील बजाज ब्लास्टर्सने डॉ. तनुजा मस्तूद यांच्या सागर सुपर क्वीन्स संघावर विजय मिळवला.
अंतिम सामना इतका चुरशीचा झाला की निकालासाठी दोन वेळा सुपर ओव्हर खेळावे लागले.डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. निर्णायक दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये डॉ. प्रियंका बजाज यांनी निर्धाव ओव्हर टाकून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात डॉ. ज्योती शेंडगे 'प्लेअर ऑफ द मॅच' ठरल्या, तर संपूर्ण स्पर्धेत डॉ. मधुरा बडे यांनी 'प्लेअर ऑफ द टुर्नामेंट'चा किताब पटकावला. बेस्ट खेळाडू म्हणून डॉ. रिता शहाणे यांना पुरस्कार दिला. बीडच्या आयएमए वुमन्स विंगच्या प्रमुख डॉ. सुनीता बारकुल यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. डॉ. सारिका क्षीरसागर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनंत मुळे, सचिव डॉ. अमोल गिते, डॉ. अनिल बारकुल, निवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, प्रा. छाया सोंडगे, अॅड. हेमा पिंपळे, डॉ. विनीता ढाकणे व देशपांडे यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत बजाज ब्लास्टर्स, सागर सुपर क्वीन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बारकुल असे तीन संघ आणि २४ महिला डॉक्टर सहभागी झाल्या होत्या. यासाठी त्यांनी काही दिवस सरावही केला होता. टर्फवर सर्व सामने खेळवण्यात आले.
विजेता संघ (बजाज ब्लास्टर्स): डॉ. प्रियंका बजाज (कर्णधार), डॉ. देवश्री निंबाळकर, डॉ. पूजा जाधव, डॉ. ऋतुजा ढाकणे, डॉ. ज्योती शेंडगे, डॉ. शीतल पाटील, डॉ. शीतल भोपळे, डॉ. रूपाली राऊत यांचा समावेश आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis