छ. संभाजीनगर - आचार्य आर्यनंदी महाराज रजत समाधी महामहोत्सव 15 फेब्रुवारी रोजी
छत्रपती संभाजीनगर, 05 फेब्रुवारी, (हिं.स.)। आचार्य आर्यनंदी महाराज यांचा रजत समाधी महामहोत्सव १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-७सिडको परिसरातील मैदानावर रामलीला आयोजित करण्यात आला आहे. श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन
छ. संभाजीनगर - आचार्य आर्यनंदी महाराज रजत समाधी महामहोत्सव 15 फेब्रुवारी रोजी


छत्रपती संभाजीनगर, 05 फेब्रुवारी, (हिं.स.)। आचार्य आर्यनंदी महाराज यांचा रजत समाधी महामहोत्सव १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-७सिडको परिसरातील मैदानावर रामलीला आयोजित करण्यात आला आहे.

श्री १००८ कलिकुंड पार्श्वनाथ सैतवाल दिगंबर जैन मंदिर, सिडको, अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था व सकल दिगंबर जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महामहोत्सवास आचार्य पवित्रसागर महाराज, मुनिश्री प्रशांतसागर महाराज व मुनिश्री १०८ प्रभावसागर महाराज यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.

१५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.०० भगवंतांचा अभिषेक व आचार्य आर्यनंदी महाराज यांच्या प्रतिमेचे पाद प्रक्षालन, सकाळी ८.३० वा. शोभायात्रा, १०.१५ वाजता ध्वजारोहण, १०.२५ वाजता मंडप उद्घाटन व आचार्य आर्यनंदी महाराज प्रतिमा अनावरण, १०.३० वाजता दीप प्रज्वलन, त्यानंतर कन्नगी जैन मंगलाचरण सादर करतील. प्रास्ताविक व त्यानंतर विशेष कथ्थकनृत्य विक्रांत वायकोस सादर करतील. सकाळी ११.३० वाजा गुरुपूजन, पाद प्रक्षालन, शास्त्र भेट, दुपारी १२ वाजता आर्यनंदी महाराज यांच्या जीवनावर शेखर भाकरे भारुड सादर करतील. यानंतर पाहुण्यांचे मनोगत, सामुहिक आचार्य परमेष्ठी जाप, आचार्य पवित्रसागर महाराज, मुनीश्री प्रभावसागर महाराज यांचे प्रवचन होईल. डॉ. मेधा लखपती सामुहिक अहिंसा गीत सादर करतील. यानंतर महाप्रसाद वाटपाने या महोत्सवाची सांगता होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande