
बीड, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।
माजलगाव तालुक्यातील उमरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. - शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने हा - सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, भव्य बैलगाडा शर्यत, तसेच पालखी सोहळा अशा विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. भाविकमोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. गावातील उमरेश्वर मंदिर परिसरात कीर्तन, भजन, यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचा अखंड हरिनाम सप्ताह आयोजनही करण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील आकर्षण असलेली बैलगाडा शर्यत हा या उत्सवाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे. शर्यतीसाठी परिसरातील तसेच इतर मराठवाड्यातील बैलगाडा मालक व शौकिन मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समितीने दिली आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली असून शर्यतीमुळे उमरी परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis