तुमचं एक मत, जिल्ह्याचं भाग्य बदलतं... महायुतीलाच साथ द्या! - भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील
लातूर, 05 फेब्रुवारी (हिं.स.) औसा तालुक्यातील मातोळा गावात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी उपस्थित राहून सभेला संबोधित केले. यावेळी मातोळा जिल्हा परिषद उमेदवार सौ. कविता काकासाहेब मोरे, पंचाय
बस्वराज पाटील


लातूर, 05 फेब्रुवारी (हिं.स.)

औसा तालुक्यातील मातोळा गावात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी उपस्थित राहून सभेला संबोधित केले. यावेळी मातोळा जिल्हा परिषद उमेदवार सौ. कविता काकासाहेब मोरे, पंचायत समिती उमेदवार सौ. स्वाती बालाजी सूर्यवंशी तसेच नांदुर्गा पंचायत समिती उमेदवार श्री. अमोल साहेबराव पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

मातोळा गावातील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

या सभेस आमदार श्री. अभिमन्यू पवार, माजी आमदार श्री. दिनकर माने, राज्य नीति मूल्य आयोगाचे अध्यक्ष श्री. पाशा पटेल, श्री. अमरआबा भोसले, श्री. मल्लिकार्जुन वाडीकर, श्री. काकासाहेब मोरे, श्री. गोविंद भोसले, श्री. शिवाजीबप्पा भोसले, श्री. गणेश पाटील, श्री. संजय उजळंबे, श्री. हणमंत माळी, श्री. संतोष सूर्यवंशी, श्री. संगमेश्वर ठेसे, श्री. प्रशांत भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande