
छत्रपती संभाजीनगर, 05 फेब्रुवारी (हिं.स.) । कन्नड तालुक्यातील बोरसर (खुर्द) येथे महाराजा सयाजीराव गायकवाड समितीच्या वतीने आयोजित जीवन गौरव सोहळ्यात मी कसा घडलो या आत्मचरित्राचे प्रकाशन मनोज जरांगे यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमास ज्ञानदास महाराज, श्री १००८ स्वामी रामेश्वरानंद सरस्वती महाराज, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ढमाले, माजी आमदार किशोर पाटील, गणपतराव गायकवाड, इंदुमती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोहळ्यात मनोज जरांगे यांनी तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आणि शिक्षण, आत्मविश्वास व सामाजिक जाणीव या तीन बाबींवर भर देत जीवनात पुढे जाण्याचा सल्ला दिला. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
मी कसा घडलो या आत्मचरित्रातून संघर्ष, कष्ट, सामाजिक बांधिलकी आणि यशाचा प्रवास उलगडण्यात आला असून, नव्या पिढीला प्रेरणा देणारा ग्रंथ ठरेल, असे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis