भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बांधणी
छत्रपती संभाजीनगर, 05 फेब्रुवारी (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रभारींची एक
Organizational structuring in the presence of BJP state president Chavan.


छत्रपती संभाजीनगर, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।

भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रभारींची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवण्यासाठी कार्यकर्ते नेते आणि पदाधिकाऱ्यांनी जागरूक राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले.

या बैठकीस जिल्ह्यातील सर्व प्रभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुकांची दिशा ठरविण्यासाठी तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

संघटनात्मक मजबुती, प्रभावी रणनीती, कार्यकर्त्यांची भूमिका व जबाबदाऱ्या यावर सखोल आणि मार्गदर्शक चर्चा करण्यात आली.

आगामी निवडणुकांमध्ये भक्कम संघटन, नियोजनबद्ध कामकाज आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीवर यश निश्चित करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande