छ. संभाजीनगर - एकाच बॅलेट युनिटवर नोंदवा 'दोन' मते
छत्रपती संभाजीनगर, 05 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मतदारांना जिल्हा
छ. संभाजीनगर - एकाच बॅलेट युनिटवर नोंदवा 'दोन' मते


छत्रपती संभाजीनगर, 05 फेब्रुवारी (हिं.स.)। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

यावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मतदारांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा दोन्ही उमेदवारांसाठी एकाच 'बॅलेट युनिट'चा वापर करावा लागणार आहे. प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

रंगसंगती आणि मतदान प्रक्रिया मतदान केंद्रामध्ये गेल्यावर बॅलेट युनिटवर उमेदवारांची नावे आणि चिन्हे दोन वेगवेगळ्या रंगांच्या पट्टयांमध्ये विभागलेली असतील. जिल्हा परिषद उमेदवारांची माहिती पांढऱ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर असेल, तर पंचायत समिती उमेदवारांची माहिती गुलाबी रंगाच्या पार्श्वभूमीवर दिसेल. मतदारांनी दोन्ही निवडी पूर्ण केल्याशिवाय मतदान प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या पूर्ण होणार नाही. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपले एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरे मत पंचायत समितीसाठी नोंदवणे अनिवार्य आहे.

एक युनिट, दोन मतेः यापूर्वी अनेकदा दोन वेगळी मशीन्स वापरली जात होती, मात्र यावेळी एकाच मशीनवर दोन्ही उमेदवारांची निवड करता येईल. अनिवार्यताः जोपर्यंत मतदार दोन्ही बटणे (एक जि.प. साठी व एक पं. स. साठी) दाबत नाही, तोपर्यंत 'बीप' आवाज येणार नाही आणि मतदा

बॅलेट युनिटवरील चिन्ह आणि उमेदवाराचे नाव नीट तपासूनच बटण दाबावे. एकाच गटातील दोन उमेदवारांना मत दिल्यास तांत्रिक अडचण येऊ शकते, त्यामुळे सूचनांचे पालन करा. मतदान कक्षात जाताना मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेण्यास मनाई आहे

प्रत्येक मत मौल्यवान आहे. मतदारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्भयपणे मतदान करावे. बॅलेट युनिटबाबत काही शंका असल्यास केंद्रावरील मतदान कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी, जेणेकरून तुमचे मत अचूक नोंदवले जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande