
छत्रपती संभाजीनगर, 05 फेब्रुवारी (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर सह संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांच्या सशक्तीकरणावर महसूल मंत्री तसा भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी
जेऊर, तालुका कन्नड येथील जाहीर सभेत विशेष भर दिला शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्ष आणि सरकार कठीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी औराळा जिल्हा परिषद सर्कलच्या अधिकृत उमेदवार सौ. मंजुषा राजेश मालोदेडे तसेच पंचायत समितीचे उमेदवार श्री. बाळू विठ्ठल मधे व श्री. प्रभाकर रतन बागुल यांच्या प्रचारार्थ
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जेऊर (ता. कन्नड) येथे भव्य जाहीर सभा यशस्वीपणे संपन्न झाली.
या जाहीर सभेमध्ये शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांच्या सशक्तीकरणावर विशेष भर देण्यात आला. शेतीसाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा, शेतरस्त्यांचे मजबुतीकरण, जलसंधारण कामे, वीजपुरवठ्याची सुधारणा, गोदामे व शीतगृहे उभारणी, बाजारपेठांपर्यंत थेट जोडणी, तसेच आधुनिक शेतीसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट व ठोस भूमिका मांडण्यात आली.
भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन शेतीला नवा आयाम मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकरी हितासाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार उपस्थित मान्यवरांनी केला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis