
लातूर, 08 फेब्रुवारी (हिं.स.नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक १५ मध्ये मिळालेल्या यशाच्या अनुषंगाने आज सकाळी प्रजापिता ब्रह्माकुमारी राजयोग सेंटर येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी आदरणीय बेहेनजी तसेच उपस्थित सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. येणाऱ्या काळात सेवाभावी मनवृत्तीने प्रभागाची तसेच संपूर्ण लातूर शहराची पूर्ण वेळ सेवा करण्याचे अभिवचन प्रेरणा होनराव यांनी यावेळी दिले.
या कार्यक्रमास प्रभाग क्रमांक १७ च्या नगरसेविका माननीय शोभाताई पाटील यांचीही उपस्थिती लाभली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis