सुपेगावमध्ये मोबाईल शूटिंगच्या गैरसमजातून मारहाण; ९ जणांविरोधात गुन्हा
रायगड, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। मुरुड पोलीस ठाणे हद्दीत सुपेगाव येथे मोबाईलवर शूटिंग केल्याच्या गैरसमजातून तरुणास व त्याच्या वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहित
हाताबुक्यांनी व


रायगड, 08 फेब्रुवारी (हिं.स.)।

मुरुड पोलीस ठाणे हद्दीत सुपेगाव येथे मोबाईलवर शूटिंग केल्याच्या गैरसमजातून तरुणास व त्याच्या वडिलांना मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी रोजी सुमारे दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुपेगाव गणपती मंदिरासमोर ही घटना घडली. गावातील आरोपी क्रमांक १ ते ९ यांच्यात भांडण सुरू असताना फिर्यादी यांच्या मुलाने त्या भांडणाचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा गैरसमज आरोपींना झाला.

जिल्हाधिकारी रायगड यांनी जमावबंदी आदेश लागू केलेले असतानाही आरोपींनी गर्दी करून फिर्यादी यांच्या मुलाला “शूटिंग का करतोस?” असे विचारत त्याचा शर्ट पकडला. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करत त्याला उचलून हाताबुक्यांनी व नखांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मुलास सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादी यांनाही आरोपी क्रमांक २ व ६ यांनी दोन्ही हात पाठीमागून पकडून ठेवले व इतरांनीही हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच आरोपी क्रमांक २ याने फिर्यादी व त्यांच्या मुलास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. झटापटीदरम्यान मुलाचा शर्ट फाटला असून त्याचा मोबाईल पडून हरवला आहे.

या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात गु.र. नं. २२/२०२६ नोंद करण्यात आली असून बीएनएस २०२३ चे कलम १८९(२), १९१(२), १९०, ३२४(४), ११५(२), ३५२, ३५१(३) तसेच मुंबई पोलीस अधिनियम ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार दसाडे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande