नागोठणे परिसरात घरफोडी; सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास
रायगड, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत मौजे शिहु येथे अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून सुमारे २ लाख २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन
Burglary in Nagothane area; Property worth Rs. 2.25 lakhs looted


रायगड, 08 फेब्रुवारी (हिं.स.)।

नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत मौजे शिहु येथे अज्ञात चोरट्याने बंद घर फोडून सुमारे २ लाख २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ६ फेब्रुवारी रोजी सायं. ४ ते ७ फेब्रुवारी रोजी सायं. ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. फिर्यादी हे साई अनंत अँव्हेन्यू, रूम नं. २०२, प्लॉट नं. ३४, सेक्टर १६ ई, रोडपाली, कळंबोली, ता. पनवेल येथे राहतात. त्यांचे मौजे शिहु, पेण येथील राहते घर बंद असताना अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराने तोडून आत प्रवेश केला.

चोरट्याने बेडरूममधील दोन्ही कपाटे चावीने उघडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २,२१,५०० रुपयांचा मुद्देमाल परस्पर संमतीशिवाय अपहार करून नेल्याची तक्रार फिर्यादी यांनी दिली आहे.

या घटनेप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात गु.र. नं. २७/२०२६ नोंद करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. सूरज पाटील हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande