परभणी - सेलू येथून सोळा वर्षीय मुलगी पळविली; तक्रार दाखल
परभणी, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। कॉलेजला जाते म्हणून घरून गेलेली सोळा वर्षीय मुलगी रात्रीपर्यंत घरी न आल्याने तसेच परिसरात शोध घेऊनही मिळून आल्याने अखेर आईने सेलू पोलिस ठाणे गाठून मुलगी कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली. सुलोचना बाल
परभणी - सेलू येथून सोळा वर्षीय मुलगी पळविली; तक्रार दाखल


परभणी, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। कॉलेजला जाते म्हणून घरून गेलेली सोळा वर्षीय मुलगी रात्रीपर्यंत घरी न आल्याने तसेच परिसरात शोध घेऊनही मिळून आल्याने अखेर आईने सेलू पोलिस ठाणे गाठून मुलगी कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली.

सुलोचना बालाजी आळणे यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची १६ वर्षीय मुलगी येथील नूतन महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिक्षण घेत असून कॉलेजला जाते म्हणून बॅग आणि कागदपत्रे घेऊन घरून निघाली. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत घरी न परतल्याने फिर्यादीचा भाऊ नरेश यांनी नूतन महाविद्यालयातील शिक्षकांना फोन कॉलद्वारे ती महाविद्यालयात आल्याची विचारणा केली असता अकरावीच्या कोणत्याही विद्यार्थ्यांना महाविद्यालयात बोलावले नसल्याचे सांगण्यात आले. तसेच फिर्यादीने मुलीच्या मैत्रीण आणी नातेवाईकांनाही विचारपूस केली मात्र ती मिळून आली नाही. यावरून फिर्यादीच्या राहत्या घरून तेली गल्ली सेलू येथून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीची आई सुलोचना बालाजी आळणे यांनी सेलू पोलिसांत दाखल केली आहे.

पुढील तपास पोलीस अंमलदार उस्मान शेख करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande