स्वामी श्रद्धानंद यांच्या १०० व्या बलिदान वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करा !
* हिंदु विधीज्ञ परिषदेचे केंद्रशासनाला आवाहन ! मुंबई, ८ फेब्रुवारी (हिं.स.) - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी, आर्य समाजाचे आधारस्तंभ आणि थोर समाजसुधारक स्वामी श्रद्धानंद यांच्या बलिदानाला वर्ष २०२६ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासि
स्वामी श्रद्धानंद


* हिंदु विधीज्ञ परिषदेचे केंद्रशासनाला आवाहन !

मुंबई, ८ फेब्रुवारी (हिं.स.) - भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी, आर्य समाजाचे आधारस्तंभ आणि थोर समाजसुधारक स्वामी श्रद्धानंद यांच्या बलिदानाला वर्ष २०२६ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक औचित्यानिमित्त केंद्र सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध करावे, तसचे अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या जीवनावर आधारित पाठाचा समावेश करावा, अशी माहिती हिंदु विधीज्ञ परिषदेने केंद्र शासनाकडे केली आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना याविषयी पत्र पाठवले आहे.

२३ डिसेंबर १९२६ या दिवशी स्वामी श्रद्धानंद यांची देहली येथे त्यांच्या निवासस्थानी अब्दुल रशीद नावाच्या धर्मांधाने गोळ्या झाडून हत्या केली. स्वामीजींनी धर्मांतरित हिंदूंना पुन्हा स्वधर्मात आणण्यासाठी ‘शुद्धी चळवळ’ राबवली होती. त्यामुळे चिडलेल्या काही कट्टरपंथीयांनी त्यांची हत्या केली. स्वामी श्रद्धानंद यांनी गुरुकुल कांगडी विद्यापीठाची स्थापना करून भारतीय शिक्षण पद्धतीला नवी दिशा दिली. समाजातील गरीब आणि शोषित वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे जीवन म्हणजे त्याग आणि तपस्या यांचे प्रतीक होते. त्यांच्यासारख्या महान व्यक्तीचा बलिदान वर्षानिमित्त शासनाने गौरव करावा, अशी मागणी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रामध्ये केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande