रायगड जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान, अनेक तालुक्यांत ७५% पेक्षा जास्त
रायगड, 08 फेब्रुवारी (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात मतदान संपन्न झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची अधिकृत वेळ अस
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात मतदान संपन्न झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची अधिकृत वेळ असली तरी काही केंद्रांवर उशिरापर्यंत रांगा असल्याने बेडीस गावात रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. जिल्ह्यात सरासरी ६९.९१ टक्के मतदान नोंदले गेले असून ग्रामीण व शहरी भागातून मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.  जिल्ह्यात एकूण १७ लाख ३८१ मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी ११ लाख ८८ हजार ८०४ मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. यात ६ लाख ४ हजार ८९६ पुरुष, ५ लाख ८३ हजार ९०४ महिला आणि ४ इतर मतदारांचा समावेश आहे. अनेक मतदान केंद्रांवर महिला व ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.  तालुकानिहाय मतदान टक्केवारीत कर्जत तालुका ७६.६० टक्क्यांसह अव्वल ठरला. त्याखालोखाल उरण (७६.५४%), खालापूर (७५.९७%), पेण (७५.३९%) आणि अलिबाग (७५.१७%) या तालुक्यांनीही उच्च मतदानाची नोंद केली. या भागांत दिवसभर मतदारांची वर्दळ कायम होती.  जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पनवेल तालुक्यात ६९.९८ टक्के मतदान झाले असून तेथे १ लाख ९५ हजार ८०० मतदारांनी मतदान केले. रोहा (६८.१६%), महाड (६७.०८%) आणि सुधागड (६६.१६%) येथे मध्यम प्रतिसाद मिळाला. तर महसळा (५१.३६%), तळा (५१.८३%), श्रीवर्धन (५५.६३%) आणि माणगाव (६१.५१%) येथे तुलनेने कमी मतदानाची नोंद झाली.  निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त, तांत्रिक सुविधा व आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले. आता सर्वांचे लक्ष ९ तारखेला होणाऱ्या मतमोजणी व निकालाकडे लागले आहे.

रायगड, 08 फेब्रुवारी (हिं.स.)।

रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी) शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात मतदान संपन्न झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची अधिकृत वेळ असली तरी काही केंद्रांवर उशिरापर्यंत रांगा असल्याने बेडीस गावात रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली. जिल्ह्यात सरासरी ६९.९१ टक्के मतदान नोंदले गेले असून ग्रामीण व शहरी भागातून मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.

जिल्ह्यात एकूण १७ लाख ३८१ मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी ११ लाख ८८ हजार ८०४ मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावला. यात ६ लाख ४ हजार ८९६ पुरुष, ५ लाख ८३ हजार ९०४ महिला आणि ४ इतर मतदारांचा समावेश आहे. अनेक मतदान केंद्रांवर महिला व ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली.

तालुकानिहाय मतदान टक्केवारीत कर्जत तालुका ७६.६० टक्क्यांसह अव्वल ठरला. त्याखालोखाल उरण (७६.५४%), खालापूर (७५.९७%), पेण (७५.३९%) आणि अलिबाग (७५.१७%) या तालुक्यांनीही उच्च मतदानाची नोंद केली. या भागांत दिवसभर मतदारांची वर्दळ कायम होती.

जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पनवेल तालुक्यात ६९.९८ टक्के मतदान झाले असून तेथे १ लाख ९५ हजार ८०० मतदारांनी मतदान केले. रोहा (६८.१६%), महाड (६७.०८%) आणि सुधागड (६६.१६%) येथे मध्यम प्रतिसाद मिळाला. तर महसळा (५१.३६%), तळा (५१.८३%), श्रीवर्धन (५५.६३%) आणि माणगाव (६१.५१%) येथे तुलनेने कमी मतदानाची नोंद झाली.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व मतदान केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त, तांत्रिक सुविधा व आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडल्याचे प्रशासनाने सांगितले. आता सर्वांचे लक्ष ९ तारखेला होणाऱ्या मतमोजणी व निकालाकडे लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके

 rajesh pande