अकोला : स्थायी समिती सभापतींनी घेतली पाणी पुरवठा विभागाची आढावा व नियोजन बैठक
अकोला, 10 मार्च (हिं.स.)। अकोला शहरात होत असलेल्या गढूळ पाणी पुरवठा आणि काही भागात पाणी पुरवठाबाबतच्या नगरसेवक आणि शहरातील नागरिकांव्दारे प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आज मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याव्दारे स्थायी समिती सभा
Photo


अकोला, 10 मार्च (हिं.स.)।

अकोला शहरात होत असलेल्या गढूळ पाणी पुरवठा आणि काही भागात पाणी पुरवठाबाबतच्या नगरसेवक आणि शहरातील नागरिकांव्दारे प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने आज मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्याव्दारे स्थायी समिती सभागृहात महापौर सौ.शारदा रणजीत खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, सभागृह नेता पवन महल्ले यांच्या विशेष उपस्थितीत पाणी पुरवठा विभागाची आढावा व नियोजन बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये सर्वप्रथम स्थयी समिती सभापती यांनी मनपा पाणी पुरवठा विभागांतर्गत शहरात करण्यात येणा-या पाणी पुरवठा बाबत आणि प्रलंबीत कामाबाबत आढावा घेण्यात आला, तसेच विभागाचे काम सुरळीत होण्यासाठी तसेच अकोला शहराला नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी लोकसंख्येच्या आधारावर एक मॅप तयार करावा, त्यानुसार अभियंते, फिटर, वॉलमन यांची नियुक्ती करावी. लोकसंख्येचे निकषावर नियुक्ती केल्यानुसार कामाची विभागणी होईल, त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मदत होईल. सद्यस्थितीत पाणी पुरवठ्यामध्ये येत असलेल्या अडचणी पाहता संपूर्ण Reschedule करून पाणीपुरवठ्याचा एक दिवस वाढवावा, जेणेकरून सगळीकडे समान आणि सुरळीत पाणीपुरवठा होईल, शहरामध्ये असलेल्या प्लॉटची संख्या आणि त्या प्रमाणात नेमके किती घर आहेत आणि त्यांना किती पाण्याची आवश्यकता आहे, यासाठी तात्काळ सर्वे करून मॅपिंग करावे जेणेकरून शहरात सुरळीत पाणीपुरवठा करणे शक्य होईल, अकोला शहराचा वाढलेला विस्तार पाहता सद्यस्थितीत अमृत 2.0 अंतर्गत अकोला वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली असून पुढील अडीच ते तीन वर्षांमध्ये शहराला नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा होणार आहे, तोपर्यंत तात्काळ उपायोजना करून पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी कार्यरत राहावे. बऱ्याच जलकुंभावर पाणी वाया जाते यासाठी उपाययोजना करून त्या ठिकाणी वाया जाणारे पाणी वाचविण्यासाठी उपाययोजना करावी. ज्या भागांमध्ये अतिरिक्त पाणी जाते अशा भागांची तपासणी करून तेथील पाणी कंट्रोल करावे, शहरांमध्ये विविध भागात असलेल्या सर्व जलकुंभामध्ये गाळ साचला असल्याची तक्रार प्राप्त होत आहे याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून त्यानुसार जलकुंभ स्वच्छ करण्याची कार्यवाही तात्काळ करावी ज्या ठिकाणी मलनिस्सारण योजनेचे काम सुरू आहे त्या ठिकाणी तात्काळ रोडचे काम पूर्ण करावे. शहरामध्ये असलेल्या अवैध नळ कनेक्शन तपासणीसाठी निविदा काढून कंत्राटदार नेमावा व शहरातील संपूर्ण नळ कनेक्शन नियमानुकूल करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी. शहरातील हद्दवाढ भागातील मलकापूर तसेच मोठी उमरी व गुडधी भागातील समस्या पाईपलाईन नव्याने टाकून सोडवावी. सर्व जलकुंभांवर तात्काळ ड्युटी रूमची व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी नळाला तोट्या नाहीत अशा ठिकाणी नागरिकांना तोट्या बसवण्याचे आवाहन करावे अन्यथा अशा ठिकाणची नळ जोडणी खंडित करावी. ही सर्व कामे तातडीने करण्यासाठी एक रोड मॅप तयार करावा त्याच्यानुसार ड्रॉइंग तयार करावे व अंदाजपत्रके सादर करून तात्काळ उपायोजना करा. कोणत्याही परिस्थितीत शहराला पाणीपुरवठा सुरळीत होणे गरजेचे आहे यासाठी सर्वांनी व्यवस्थित काम करावे आदी सुचना यावेळी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande