हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे
हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे यांची बिनविरोध निवड झाली
हातकणंगले पंचायत समिती सभापती निवड


कोल्हापूर, 10 मार्च (हिं.स.)।

हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.

२२ सदस्य संख्या असणाऱ्या हातकणंगले पंचायत समितीमध्ये शिवसेना भाजपा महायुतीचे तब्बल १७ सदस्य निवडून येत स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीला घवघवीत यश मिळाले. २२ सदस्य संख्या असणाऱ्या हातकणंगले पंचायत समितीमध्ये शिवसेना भाजपा महायुतीचे तब्बल १७ सदस्य निवडून येत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यानुसार आज सभापती व उपसभापती निवडी खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजीजि.प सदस्य अरुणराव इंगवले, माजी. सभापती राजेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांच्या पुढाकाराने व सहकार्याने बिनविरोध पार पडल्या.

निवडणूक प्रक्रिया तहसीलदार सुशील बेलेकर, गटविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी यांच्या अध्यक्षतेखाली हातकणंगले पंचायत समिती सभागृहात पार पडली.

निवडी नंतर नूतन सभापती पदी व उपसभापती पदी यांना माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक - गोकुळ दूध संघ, कोल्हापूर) यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande