
भंडारा, 10 मार्च (हिं.स.)।
जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली... पवनी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाने शाळेतील पाच लहान मुलींसोबत अश्लील कृत्य केले. आज पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली आहे...
समाजाला लाजवेल अशी असताना घटना आज पवनी तालुक्यात घडली आहे... पुढची पिढी घडविणाऱ्या शिक्षकानेच आपल्या शाळेतील पाच मुलींसोबत लैंगिक अत्याचार केलं आहे... पवनी तालुक्यातील वडेगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनिल राऊत हा मागील पाच वर्षांपासून कार्यरत आहे. त्यांनी शाळेतील पाच लहान मुलींसोबत लैंगिक कृत्य केलं. जर ही वाच्यता कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली होती. अखेर एका मुलींनी आपल्या पालकांना सांगितले. ही बाब खूपच धक्कादायक असल्याने पालकांनी आरोपी शिक्षकाला चांगलाच चोप दिला. व लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा गांभीर्य लक्षात घेत आरोपी शिक्षकाला अटक करत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar