
पुणे, 10 मार्च (हिं.स.)।‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्यामुळे पुण्यातील झोपडपट्टी परिसरातून एका २० वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे. संबंधित घोषणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. या घटनेनंतर परिसरातील मुस्लीम कुटुंबांनी सोमवारचा इफ्तार रद्द केला. या परिसरातील काही हिंदू कुटुंबांनीही आरोपी तरूणाच्या कुटुंबाला आधार दिला आहे. सदर तरूणाने मस्करीत टिप्पणी केली होती, अशी भूमिका काही जणांनी व्यक्त केली आहे.
२० वर्षांचा तरूण त्याच्या कुटुंबातील एकटा कमावता व्यक्ती आहे. इलेक्ट्रिशियनचे काम करणाऱ्या या तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर या तरुणाला अटक करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु