डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; गुन्हा दाखल
रायगड, 10 मार्च, (हिं.स.)। पेण तालुक्यातील नवीन साई सहारा हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुस
Biker dies in dumper collision; Case registered at Dadar Maritime Police


रायगड, 10 मार्च, (हिं.स.)। पेण तालुक्यातील नवीन साई सहारा हॉटेलसमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा झारखंड राज्यातील हजारीबाग जिल्ह्यातील परासी येथील रहिवासी असून त्याच्या ताब्यातील डंपर (क्र. एमएच 46 बीएफ 4590) हा मुंबईकडून पेणकडे येत होता. दरम्यान नवीन साई सहारा हॉटेलसमोर त्याने डंपर अतिवेगाने, हयगयीने व बेदरकारपणे चालवित असताना समोरून येणाऱ्या मोटारसायकल स्कुटी (क्र. एमएच 06 बीवाय 7577) ला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेप्रकरणी दादर सागरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०८/२०२६ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम १०६, २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सकपाळ हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande