सराफ दुकान अज्ञातांनी फोडले; रोख रकमेसह दागिने व इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास
नंदुरबार, 10 मार्च, (हिं.स.) शहादा तालुक्यातील मंदाणे येथे सराफ दुकान फोडून जवळपास ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. फिर्य
सराफ दुकान अज्ञातांनी फोडले; रोख रकमेसह दागिने व इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास


नंदुरबार, 10 मार्च, (हिं.स.) शहादा तालुक्यातील मंदाणे येथे सराफ दुकान फोडून जवळपास ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. फिर्यादी प्रितेश नरेंद्र सोनार (वय ३२, रा. सोनार गल्ली, शहादा) यांचे मंदाणे येथे सराफ दुकान आहे. त्यांनी दुकान बंद केले होते. त्यानंतर सकाळी ६:३० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी दुकानातील विविध वस्तूंवर हात साफ केला. यात सुमारे ५ हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा, ९ हजार रुपये किमतीची ७५ ग्रॅम वजनाची चांदीची फुली, १० हजार रुपये किमतीची चांदीची नाणी, ७ हजार रुपये किमतीचा क्रोमा कंपनीचा टीव्ही, ७ हजार रुपये किमतीचा डीव्हीआर तसेच १० ग्रॅम चांदीचा तुकडा आणि २३०० रुपये रोख रक्कम असा एकूण ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. फिर्यादी प्रितेश सोनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहादा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३३१(४) आणि ३०५(A) नुसार गुन्हा क्रमांक २८६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मोहन साबळे करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande