गोमांस विक्रीवर धाड; पिता-पुत्रासह तिघांना अटक
जळगाव, 10 मार्च (हिं.स.)रावेर तालुक्यातील रसलपूर येथे अवैधरीत्या गोवंश कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पितापुत्रासह तिघांना अटक करण्यात आली असून सुमारे ३१ हजार रुपये किमतीचे अंदाजे १७५ किलो गोमां
गोमांस विक्रीवर धाड; पिता-पुत्रासह तिघांना अटक


जळगाव, 10 मार्च (हिं.स.)रावेर तालुक्यातील रसलपूर येथे अवैधरीत्या गोवंश कत्तल करून गोमांस विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत पितापुत्रासह तिघांना अटक करण्यात आली असून सुमारे ३१ हजार रुपये किमतीचे अंदाजे १७५ किलो गोमांस आणि धारदार सुरे जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रसलपूर गावातील कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकला. या कारवाई दरम्यान शेख युसुफ शेख अय्युब कुरेशी (वय ५०) आणि शेख सानिफ शेख युसुफ कुरेशी (वय २५) हे पिता-पुत्र गोवंश जातीच्या जनावरांचे मांस कापून विक्री करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे २६ हजार रुपये किमतीचे अंदाजे १३० किलो गोमांस तसेच धारदार कोयता जप्त करण्यात आला. दरम्यान, दुसऱ्या कारवाईत शेख नईम शेख अय्युब कुरेशी हा पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री करताना आढळून आला. पोलिस पथक जवळ येत असल्याचे लक्षात येताच त्याने पळ काढला होता. मात्र पोलिसांनी शोध घेऊन त्यालाही ताब्यात घेतले. त्या ठिकाणाहून सुमारे ५ हजार रुपये किमतीचे २५ किलो गोमांस आणि धारदार कोयता जप्त करण्यात आला. या दोन कारवाईत मिळून सुमारे ३१ हजार रुपये किमतीचे अंदाजे १७५ किलो गोमांस जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रंजीत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले असून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande