मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील बोगद्यात ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू
रायगड, 10 मार्च, (हिं.स.)। मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन बोगद्यात दोन ट्रकच्या अपघातात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ९) सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास खालापूर तालुक्यातील आडोशी गाव हद्दीत घडली. या प्रकरणी खोपोली पो
Truck accident in tunnel on Mumbai-Pune Expressway; Driver dies


रायगड, 10 मार्च, (हिं.स.)। मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील नवीन बोगद्यात दोन ट्रकच्या अपघातात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ९) सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास खालापूर तालुक्यातील आडोशी गाव हद्दीत घडली. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक एमएच 43 वाय 6936 वरील चालक हा उत्तरप्रदेश राज्यातील रायबरेली जिल्ह्यातील कोटवाली परिसरातील रहिवासी होता. तो आपला ट्रक मुंबई लेनवरील नवीन बोगद्यातून जात असताना वाहन अतिवेगाने व हयगयीने चालवत होता. यावेळी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्याने पुढे असलेल्या ट्रक (क्र. एमएच 46 एफ 5913) ला बाजूने जोरदार धडक दिली.

धडक दिल्यानंतर सुमारे ५०० मीटर अंतरावर जाऊन संबंधित ट्रक डिव्हायडरवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालकाला गंभीर दुखापती झाल्या असून त्यातच त्याचा मृत्यू झाला. तसेच दुसऱ्या ट्रक चालकालाही लहान-मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा र. नं. ८३/२०२६ नोंद करण्यात आला आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक फेंगडु करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande