
चंद्रपूर, 11 मार्च (हिं.स.)।
येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या 'इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग, रिसर्च अँड स्पेशलाइज स्टडीज' (संशोधन केंद्र) च्या वतीने व राजीव गांधी राष्ट्रीय बौध्दिक संपदा व्यवस्थापन संस्था (आरजीएनआयआयपीएम) नागपूर, भारत सरकार यांच्या सहकार्याने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात येत्या मंगळवार, दि. १३ मार्च रोजी करण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या स्व. अब्दुल शफी सभागृहात हा कार्यक्रम होणार असून 'इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्स अँड पेटंट, डिझाईन फिलिंग' हा या कार्यशाळेचा विषय आहे. सदर कार्यशाळेत 'आरजीएनआयआयपीएम'चे पेटंट व डिजाइनचे सहाय्यक नियंत्रक कुमार राजु हे दुपारी १२ ते १ च्या दरम्यान 'सिस्को वेबैक्स' च्या माध्यमातून ऑनलाइन व्याख्यान देणार आहेत.
भारतात बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) हे आविष्कार, डिझाईन आणि इतर सर्जनशील कामांना संरक्षण देतात, ज्यात पेटंट आणि डिझाईन नोंदणी महत्त्वाची आहे. तेव्हा
त्याचे प्रकार, प्रक्रिया व फायदे यावर नेमके मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने 'नॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अवेअरनेस मिशन' अंतर्गत सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचा लाभ प्राध्यापक, शिक्षक, पदव्युत्तर विद्यार्थी व संशोधकांनी घेण्याचे आवाहन महाविद्यालयाच्या 'इन्स्टिट्यूशन ऑफ हायर लर्निंग, रिसर्च अँड स्पेशलाइज स्टडीज'चे प्रमुख तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर व समन्वयक डॉ. रक्षा पी. धनकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव