चंद्रपूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कामाचे भारत गणेशपुरे यांच्या हस्ते लोकार्पण
चंद्रपूर, 11 मार्च, (हिं.स.)। राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ कामाचे लोकार्पण भारत गणेशपुरे यांच्या हस्ते भद्रावती तालुक्यातील सागरा येथे करण्यात आले. हे अभियान केवळ बक्षीसाप
चंद्रपूर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कामाचे भारत गणेशपुरे यांच्या हस्ते लोकार्पण


चंद्रपूर, 11 मार्च, (हिं.स.)। राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ कामाचे लोकार्पण भारत गणेशपुरे यांच्या हस्ते भद्रावती तालुक्यातील सागरा येथे करण्यात आले. हे अभियान केवळ बक्षीसापुरते मर्यादित न राहता, गावा-गावात एकोपा वाढून लोकसहभागातून काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केले.

कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) गिरीश घायगुडे होते. यावेळी गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, सहा.गट विकास अधिकारी डॉ. बंडु आकनुरवार, संजय नैताम, ग्रामपंचायत प्रशासक शंकर रासेकर, मंगेश भोयर, सुधाकर रोहणकर, प्रदीप महाकाळकर, एकनाथ घागी, मनिषा रोडे, छाया जंगम उपस्थित होते.

प्रथम लेझीम आणि भजन दिंडीच्या गजरात स्वागत झाल्यानंतर दीप प्रजल्वन मालार्पण करण्यात आले. अभिनेता भारत गणेशपुरे यांच्यासह या अभियानात नाविन्यपूर्ण उपक्रमात लोकसहभाग व वर्गणीतून उभारण्यात आलेले गोरक्षण, सार्वजनिक सभागृह, स्मशानभुमी, निराधार गृह, व्यायाम शाळा, जि.प. शाळा बांधकामाच्या वर्गखोल्यांना भेटी देऊन लोकार्पण करण्यात आले. यावेळी मराठी अभिनेते भारत गणेशपुरे, गिरीश घायगुडे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत नावीन्यपूर्ण उपक्रमासह आठ मुद्यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande