परळी मतदारसंघातील रस्ते विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर
बीड, 11 मार्च (हिं.स.)।परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी आणि दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि स्थानिक आमदार धनंजय मुंडे
परळी मतदारसंघातील रस्ते विकासासाठी २५ कोटींचा निधी मंजूर


बीड, 11 मार्च (हिं.स.)।परळी वैजनाथ विधानसभा मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी आणि दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. राज्याचे माजी मंत्री आणि स्थानिक आमदार धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे महायुती सरकारने या विकासकामांना हिरवा कंदील दाखवला असून, यामुळे परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. या निधीतून प्रामुख्याने दाबी-इंदपवाडी, जोगाईवाडी-राडी, नाश्रा-इंजेगाव आणि जिवनापूर-गोवर्धन यांसारख्या प्रमुख मार्गांचे काम पूर्ण केले जाणार आहे. यात रस्ते सुधारणांसोबतच काही ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि नाली बांधकामांचाही समावेश आहे. मतदारसंघातील रस्ते अधिक दर्जेदार व्हावेत या उद्देशाने हा निधी खर्च केला जाणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानले असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande