
सोलापूर, 12 मार्च, (हिं.स.) - माढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज प्रेक्षक गॅलरीतून प्रत्यक्ष पाहून लोकशाही प्रक्रियेचा अनुभव घेतला.सभागृहातील कामकाज कशा पद्धतीने चालते, लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न कसे मांडतात? राज्याच्या विकासासाठी निर्णय कसे घेतले जातात.. याची मुलांना आमदार अभिजीत पाटील यांनी स्वतः माहिती सांगितली.
गावाकडची मुलं-मुली मुंबईसारख्या ठिकाणी येऊन सभागृहाचं कामकाज पाहतात तेव्हा अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांनी मोठं होऊन सभागृहात उच्च अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी म्हणून कामकाज पहावे. यासोबतच गावाकडची जुनी म्हण म्हणजे - 'जीवाची मुंबई' करताना लहानग्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. त्यांच्या देखील आयुष्यातील कधीच न विसरणारा क्षण असून त्यांच्या आनंदात खूप समाधान मिळाले
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड