प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे, 12 मार्च (हिं.स.)। प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेअंतर्गत पुणे म्हाडाच्यामार्फत बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांसाठी पुणे शहरात एकूण ५७ घरकुले राखीव ठेवण्यात नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
प्रधानमंत्री आवास (शहरी) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


पुणे, 12 मार्च (हिं.स.)।

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या योजनेअंतर्गत पुणे म्हाडाच्यामार्फत बांधण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांसाठी पुणे शहरात एकूण ५७ घरकुले राखीव ठेवण्यात नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात येत आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेअंतर्गत पुणे मंडळातर्फे परवडणारी घरे योजनेअंतर्गत एकूण १२ प्रकल्पामध्ये एकूण २ हजार ३९८ घरकुल बांधकाम पुणे म्हाडाच्यामार्फत करण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) परवडणारी घरे योजना घटकांतर्गत म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नागरिकांसाठीघरकुले राखीव ठेवण्यात आली आहेत. या योजनांची कामे पुर्ण होऊन सद्यस्थितीत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सदनिका उपलब्ध आहेत.

या योजनेचा लाभ घेताना अर्ज करणेसाठी मुख्य कार्यकारी, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकारा मंडळ (म्हाडा), गृहनिर्माण भवन, आगरकरनगर, पुणे-१ या कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीकरिता https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx तसेच https://pmay-urban.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रधानमंत्री आवास योजना- शहरी २.० या मार्गदर्शिकेचेही अवलोकन करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, विशाल लोंढे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande