सोन्याचे वाढते दर; सराफा बाजारात शुकशुकाट
लातूर, 12 मार्च (हिं.स.)। सोन्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ आणि भावातील अस्थिरता यामुळे सध्या सराफा बाजारपेठेत मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या किमतीमुळे ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असून याचा थेट परिणाम सराफ
सराफा बाजार


लातूर, 12 मार्च (हिं.स.)।

सोन्याच्या दरात सातत्याने होणारी वाढ आणि भावातील अस्थिरता यामुळे सध्या सराफा बाजारपेठेत मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या किमतीमुळे ग्राहकांनी सोन्याच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असून याचा थेट परिणाम सराफा व्यावसायिकांवर होत आहे.

सध्या लग्नसराईचा हंगाम तसेच सणासुदीचे दिवस असतानाही बाजारपेठेत अपेक्षित गर्दी दिसत नाही. सोन्याचे दर रोज बदलत असल्याने ग्राहक संभ्रमात असून त्यांनी खरेदी पुढे ढकलण्याचा कल वाढवला आहे. परिणामी अनेक सोनार दुकानांमध्ये दिवसभर शुकशुकाट दिसून येत आहे.

दरम्यान, शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांची आर्थिक

परिस्थिती कमकुवत झाली आहे. यामुळे पारंपरिक पद्धतीने लग्नसमारंभासाठी किंवा सणांसाठी होणारी सोन्याची खरेदीही कमी झाली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वाढत्या किमतीमुळे ग्राहकांची अवस्था बिकट झाली

असून 'सोनं पाहावं की भाव?' अशी वेळ ग्राहकांवर आली आहे. सराफा व्यावसायिक दर स्थिर होण्याची प्रतीक्षा करत असून दर स्थिर झाल्यासच बाजारपेठेत पुन्हा चैतन्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande