पुणे विद्यापीठामार्फत 'सावित्रीबाई सन्मान ' कर्तृत्ववान महिलांना प्रदान
पुणे, 12 मार्च (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले सन्मान सेाहळा संपन्न झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे महिला शिक्षण आणि समाजसुधारणेच्या कार्याच
Gh


पुणे, 12 मार्च (हिं.स.)।

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले सन्मान सेाहळा संपन्न झाला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे महिला शिक्षण आणि समाजसुधारणेच्या कार्याचे स्मरण व्हावे या उद्देशाने विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने गौरविले जाते. यावर्षी सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आला. यावेळी नासा भेटीसाठी निवड झालेल्या भोर तालुक्यातील आदिती पारठे आदिती राऊत, क्रिकेटर पुनम खेमनार, वनसंरक्षक विजया वसावे, सामाजिक कार्यकर्त्या ममता सपकाळ, गोंदिया येथे जलसंवर्धनाचे कार्य करणाऱ्या शालू कोल्हे यांना गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, सावित्रीबाई फुले सन्मान नामनिर्देशन समितीच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, प्रमुख पाहुण्या श्रीमती वीणा गोखले, सावित्रीबाई फुले सन्मान नामनिर्देशन समितीचे सदस्य डॉ. सोनिया नगराळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अशा प्रकारचे उपक्रम आयोजित केल्याने समाजासमोर एक ठेवला जातो आणि कार्य करणाऱ्या व्यक्तीला कौतुकाची थाप मिळते आणि प्रकाशझोतापासून दूर असणाऱ्या महिलांचा सन्मान केला जात असल्याचा उल्लेख डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी केला.

यानंतर उपस्थित सर्व सन्मानार्थी महिलांचा मा. कुलगुरू व समिती सदस्य यांच्या हस्ते सावित्रीबाईंचा पुतळा, स्मृतीचिन्ह, शाल, सन्मानपत्र व ११,००० रुपयांचा चेक देऊन सन्मानित करण्यात आले आदिती राऊत व आदिती पारठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपली नासामध्ये झालेली निवड आणि त्यासाठी आपण केलेले परिश्रम याविषयी माहिती दिली. तसेच मराठी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे कोणत्याच बाबतीत कमी नसतात आणि मराठी शाळा ही कमी नसतात असे उद्गार यांनी यावेळी काढले.

श्रीमती शालू कोल्हे यांना गोंदिया जिल्ह्याचा परिसर, तेथील पाण्याचे कमी होणारे साठे, तेथील बदलती जैवविविधता याविषयी विचार करून ते तलाव जीवित कसे करता येतील याविषयी विचार केला आणि तो प्रत्यक्षात आणला. तेथील महिलांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले. हे करताना त्यांना अनेक अडचणी आल्या आणि अनेकांची साथ ही लाभली याचा आनंद व्यक्त केला.

श्रीमती ममता सपकाळ यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने गौरवले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला 2009 मध्ये आपल्या आईला श्रीमती सिंधुताई सपकाळ यांना विद्यापीठाने जीवन गौरव देऊन गौरवले होते याची आठवण देत त्यांनी आपल्या कामाविषयी ती माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती वीणा गोखले यांनी आपल्या 'समाजाचे देणे' या संस्थेविषयी माहिती देताना विद्यार्थ्यांमध्ये दानाचे संस्कार रुजवणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. असे उपक्रम राबवताना वेवेगळ्या वयाची पार्श्वभूमी असणारी अनेक माणसे जोडली जातात व या उपक्रमाला बळ मिळते असे नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत, शिवाय नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत स्किल डेव्हलपमेंट शिक्षण दिले जात आहे, असे मत व्यक्त केले. विद्यापीठाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होत आहे याचा आनंद व्यक्त केला. ज्या सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या सावित्रीच्या लेकीचं सन्मान होतो आहे आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसमोर अनेक आदर्श उभे राहतात. कु अदिती पार्थे आणि आदिती राऊत या दोघी लहान मुलीचे त्यांनी आवर्जून कौतुक केले आणि सर्वांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande