सोलापूर - एप्रिलमध्ये राज्यात मतदार यादी शुद्धीकरण मोहीम
सोलापूर, 12 मार्च, (हिं.स.) - राज्यातील मतदार याद्यांमधील दुबार किंवा बोगस नावे शोधून त्यात दुरुस्ती करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष फेरपडताळणी मोहीम राबविण्याची तयारी सुरू आहे. एप्रिल महिन्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या माध्यमातून
सोलापूर - एप्रिलमध्ये राज्यात मतदार यादी शुद्धीकरण मोहीम


सोलापूर, 12 मार्च, (हिं.स.) - राज्यातील मतदार याद्यांमधील दुबार किंवा बोगस नावे शोधून त्यात दुरुस्ती करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष फेरपडताळणी मोहीम राबविण्याची तयारी सुरू आहे. एप्रिल महिन्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली. याबाबत अद्याप आयोगाने आदेश दिले नसले तरी राज्य निवडणूक आयोग मतदार यादी शुद्धीकरणाची मोहिम राबवणार आहे. सूचना मिळताच बीएलओंना प्रशिक्षण देऊन मोहीम सुरू केली जाणार आहे.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांबाबत आक्षेप घेतल्यानंतर मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया गतिमान करण्यात येणार असल्याचे समजते. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला लवकरच मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत. संभाव्य दुबार नावांची यादी तयार करून त्यांची तपासणी केली जाणार असून, विधानसभा मतदारसंघातील मूळ मतदार यादीतील नावे, पत्ते आणि इतर माहितीची पडताळणी केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande