अकोला - मालमत्ता हस्तांतरण शुल्क कमी करण्यासाठी नगरसेवक रफीक सिद्दीकी यांचे निवेदन
अकोला, 13 मार्च (हिं.स.)। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता हस्तांतरण शुल्क (संपत्ति हस्तांतरण शुल्क) कमी करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक रफीक सिद्दीकी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर, उपमहापौर,सभापती तसेच महानगरपालिका आयुक्त यांना निवे
Photo


अकोला, 13 मार्च (हिं.स.)। अकोला महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता हस्तांतरण शुल्क (संपत्ति हस्तांतरण शुल्क) कमी करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक रफीक सिद्दीकी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर, उपमहापौर,सभापती तसेच महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पूर्वी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार मालमत्ता खरेदी केल्यानंतर ती मालमत्ता करामध्ये आपल्या नावावर नोंद करण्यासाठी केवळ ₹500 इतके हस्तांतरण शुल्क आकारले जात होते. मात्र प्रशासकीय कार्यकाळात हा निर्णय बदलण्यात आला असून आता मालमत्ता हस्तांतरणासाठी खरेदी किमतीच्या 1 टक्के किंवा किमान ₹15,000 इतके शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत जास्त असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच एखादी मालमत्ता खरेदी करताना नागरिकांना आधीच मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) तसेच इतर शासकीय शुल्क भरावे लागतात. त्यानंतरही मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी इतके मोठे शुल्क आकारणे योग्य नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

या वाढीव शुल्कामुळे अनेक नागरिकांनी खरेदी केलेली मालमत्ता आजपर्यंत आपल्या नावावर हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकेचे अभिलेख अद्ययावत राहत नाहीत आणि नागरिकांवर अनावश्यक आर्थिक भार पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

म्हणून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता हस्तांतरण शुल्क पूर्वीप्रमाणे ₹500 किंवा जास्तीत जास्त ₹1000 इतके निश्चित करावे, अशी मागणी नगरसेवक रफीक सिद्दीकी यांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande