
अकोला, 13 मार्च (हिं.स.)। घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर मिळून या कार्यालयचे 9 पथके गठीत करण्यात आलेली आहेत. या पथकामार्फत एकुण 34 सर्व गॅस एजन्सीची तपासणी करण्याचे व अकोला जिल्हयाचे कार्यक्षेत्रात घरगुती वापराचे गॅस सिलेंडरवर नियंत्रण तसेच नागरीकांना गॅस सिलेंडरचा पुरवठा / वितरण सुरळीत करण्यासाठी नियोजन करण्याचे याद्वारे आदेशीत करण्यात आलेले आहे. गठीत पथकामार्फत कार्यक्षेत्रातील व्यावसायीक विविध ठिकाणांची तपासणी करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यनावार यांनी सांगितले.
सहा ठिकाणी कारवाई!
आज रोजी पथकाने 25 व्यावसायीक प्रतिष्ठांनावर भेटी दिल्या. भेटी दरम्यान अवैधरित्या घरगुती वापराचे गॅस सिलेंडर व्यावसायाच्या ठिकाणांवर वापरतांना आढळून आल्याने धडक कारवाई करून 6 ठिकाणांवरून एकुण 08 घरगुती गॅस सिलेंडर जप्तीची कारवाई केली.
अकोला जिल्हयामध्ये घरगुती वापराचे गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अनावश्यक गर्दी गॅस एजन्सीमध्ये करू नये. अकोला जिल्हयातील नागरीकांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे