
कोल्हापूर, 13 मार्च (हिं.स.) : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कृष्णराज महाडिक यांनी नवी दिल्ली येथे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तसेच युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांच्याशी चर्चा करून पक्ष संघटन आणि युवकांच्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन घेतले.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून कृष्णराज महाडिक यांनी संघटनेच्या कामकाजाला सुरुवात केली. गेल्या तीन दिवसांपासून ते नवी दिल्लीत असून पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद साधत आहेत.या भेटीदरम्यान युवकांचे प्रश्न, पक्ष संघटनाची रचना, युवकांच्या अपेक्षा, भाजपची विचारधारा तसेच युवा मोर्चाचा विस्तार या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. युवा मोर्चाची पुढील वाटचाल कशी असावी याबाबतही कृष्णराज महाडिक यांनी मार्गदर्शन घेतले.युवकांना अधिकाधिक प्रमाणात भाजपचे सदस्यत्व देणे, युवांसाठी रोजगार मेळावे आयोजित करणे तसेच युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी विविध उपक्रम राबविणे या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली.कृष्णराज महाडिक यांच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल आणि भविष्यातील कार्यासाठी नितीन नबीन व तेजस्वी सुर्या यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
----------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar