रोहा रेल्वे फाटकाजवळ एसटी कर्मचाऱ्यावर हल्ला; शासकीय वाहनाची तोडफोड
रायगड, 13 मार्च (हिं.स.)। रोहा पोलीस ठाणे हद्दीत रोहा–नागोठणे मार्गावर पिंगळसई गावाजवळील रेल्वे फाटकाजवळ एसटी कर्मचाऱ्यावर हल्ला करून शासकीय वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळाल
roha


रायगड, 13 मार्च (हिं.स.)। रोहा पोलीस ठाणे हद्दीत रोहा–नागोठणे मार्गावर पिंगळसई गावाजवळील रेल्वे फाटकाजवळ एसटी कर्मचाऱ्यावर हल्ला करून शासकीय वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 12 मार्च) रात्री सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे पनवेलहून रोहा एसटी डेपोमध्ये येत होते. रोहा रेल्वे फाटकाजवळ गाडी थांबवून फाटक उघडण्याची वाट पाहत असताना ही घटना घडली. त्यावेळी एक अनोळखी इसम प्लॅटीना मोटारसायकल (क्र. एमएच 06 एआर 5872) वरून मागून आला.

या व्यक्तीने अचानक फिर्यादींच्या गाडीसमोर येत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याने फिर्यादींना हाताने मारहाण केली तसेच गाडीवर दगड मारून नुकसान केले. याशिवाय वाहनाचा दरवाजा जोरात आपटून काच फोडून शासकीय वाहनाची तोडफोड केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 61/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 132, 352, 351(2) व 324(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक शिरसाठ करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande